‘स्वयंप्रकाशित व्हायचंय’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न

      कॉम्रेड शरद् पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आय.एम.ए हॉल,धुळे येथे प्रणाली मराठे (गायकवाड)लिखित 'स्वयंप्रकाशित व्हायचंय' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी लेखिका तृष्णाकार कॉम्रेड नजुबाई गावित यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रकाशन सोहळ्यास मा.शंभू पाटील रंगकर्मी,संस्थापक परिवर्तन नाट्य संस्था जळगाव, मा.प्राध्यापक गंगाधर अहिरे लेखक,कवी नाशिक,जेष्ठ पत्रकार गो.पी लांडगे धुळे,श्री वसंतराव गायकवाड हे प्रमुख अतिथी तर अध्यक्षस्थानी मा.संजय मोहिते राष्ट्रीय संघटन सचिव बामसेफ नवी दिल्ली हे होते.या प्रसंगी कॉम्रेड नजूबाई गावित यांनी आपल्या भाषणातून महिलांना साहित्य क्षेत्रात येण्याचं आवाहन केलं.साहित्यातून महिला वर्गाचं दुःख,वेदना,त्यांचे प्रश्न मांडणे आवश्यक आहे.कारण महिला या महिलांचं दुःख चांगल्या प्रकारे जाणतात.म्हणून महिला सामाजिक चळवळीत आल्यात तर महिलांवरील अन्याय अत्याचाराला न्याय मिळू शकेल.
    माननीय शंभू पाटील यांनी आपल्या मनोगत मनोगत सर्व प्रकारचे जाती-धर्मभेद विसरून मानवतावादी,समतावादी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे यावर भर दिला. त्याचबरोबर संत कबीर,संत नामदेव,संत जनाबाई आणि कवयित्री बहिणाबाई यांचे संदर्भ देऊन आपल्या देशातील संतांची वैश्विक कल्याणची परंपरा ही संपूर्ण मानव जातीसाठी आदर्श कशाप्रकारे आहे हे सांगितले.प्रा.गंगाधर अहिरे म्हणाले की,कोणत्याही कविचे किंवा लेखकाचे साहित्य हे दर्जेदार आहे की नाही हे काळच ठरवित असतो. जगात ज्या काही क्रांत्या झाल्या त्या मागची प्रेरणा ही साहित्यातूनच मिळालेली आहे.म्हणून साहित्य हे परिवर्तनाचं साधन असतं हे त्यांनी जगातील प्रसिद्ध कवी,लेखक यांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
    काव्यसंग्रहाच्या लेखिका कवयित्री प्रणाली मराठे(गायकवाड) यांनी आपल्या मनोगतात प्राथमिक शिक्षिकेपासून फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ती ते कवयित्रीपर्यंतचा प्रवास आपल्या शब्दांत सांगितला. कॉ.शरद् पाटील आणि कॉ.नजुबाई गावीत यांचे  कार्य ही माझ्या लिखाणामागची प्रेरणा आहे असंही त्या म्हणाल्या. ॲड.चैताली गायकवाड यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करताना प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला संघर्ष येतोच.तो संघर्ष प्रणाली मराठे यांच्या देखील वाट्याला आला.परंतु कोणत्याही संकटांना न घाबरता त्या आजही महामानवांच्या विचारांच्या दिशेने मार्गक्रमण करीत समाजाचं प्रबोधन देखील करीत आहेत.
      अध्यक्षीय भाषणात मा.संजय मोहिते यांनी काव्यसंग्रहाच्या लेखिका प्रणाली मराठे यांनी आजच्या या सांस्कृतिक संघर्षाच्या वातावरणात मानवतावादी, समतावादी विचारधारा असलेला काव्यसंग्रह प्रकाशित केल्याबद्दल  अभिनंदन केले.त्याचबरोबर कवी, लेखक,साहित्यिक यांनी 

जातवर्गस्त्रीदास्यांतासाठी तसेच संविधानिक मुल्यांच्या प्रचार प्रसारासाठी आपली लेखणी चालविणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी मा.महेंद्र सोनवणे प्र.अ.मनपा शि.मं.धुळे, मा.प्रकाश जाधव निवृत्त प्र.अ.मनपा. शि.मं.धुळे मा.अनिल दामोदर, प्रा.डॉ.अनिल बैसाणे,प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी, ॲड. विशाल साळवे मा.हरिश्चंद्र लोंढे, मा.सत्तार शाह, मा.राजेंद्र इंगळे, राजुभाऊ जाधव,राजेश गायकवाड,विजय साळवे,राम जाधव, दत्तात्रय कल्याणकर, गझलकार प्रा.शिवाजी साळुंखे त्याचबरोबर बामसेफचे कार्यकर्ते डॉ.दिलीप लोखंडे, ॲड.प्रसेनजित बैसाणे,प्रा.मोहन मोरे,नरेंद्र खैरनार,संजय निकुंभे,रवींद्र मोरे, सुनिल सरदार, आप्पा कुवर,दिपक जाधव,निलेश बोरसे,संघरत्न नेरकर,राजदीप वाघ,सुभाष पगारे,कविदास जगताप, गौतम नवगिरे,रोहन मोरे, वृषभ अहिरे, राकेश अहिरे,अरुणा मोरे,उषा मोरे,भारती बैसाणे,निशा जाधव, जागृती गायकवाड,जर् गायकवाड तसेच मराठा पंच मंडळ, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, भारतीय बौद्ध महासभा, लुंबिनी बुद्ध विहार समिती,सत्यशोधक विद्यार्थी संघटना,प्रा.शिक्षक संघटना, मनपा शि.मंडळ, धुळे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सुरेश मोरे, प्रास्ताविक मा.जय वाघ पाहुण्यांचा परिचय राहुल गायकवाड, आभार प्रदर्शन प्रज्ञा मोरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बामसेफ धुळे युनिटच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here