मूलनिवासी संघा तर्फे नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘संविधान दिवस’ हर्षोल्लासात साजरा.

दिनांक 26-11-2020 ला नागपूर येथे मूलनिवासी संघ व नालंदा बुद्ध विहार समिती तर्फे संविधान दिवस हर्षोलासात साजरा करण्यात आला .याप्रसंगी नालंदा बुद्ध विहार ते त्रिशरण चौक, रामेश्वरी पायदळ रैली काढण्यात आली, बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून सामूहिक रित्या संविधानाचे प्रास्ताविक वाचन करण्यात आले. तसेच नागरिकांनी संविधान वाचावे व त्यांना समजावे याकरिता मूलनिवासी संघा तर्फे संविधानाची संक्षिप्त स्वरूपातील सोप्या भाषेतील पुस्तके वितरित करण्यात आलीत.
याप्रसंगी मूलनिवासी संघाचे नागपूर जिल्हा सदस्य आकाश कांबळे यांनी संविधानात दिलेल्या हक्क अधिकार संदर्भात नागरिकांना माहिती दिली.
या उपक्रमाचे आयोजक नालंदा बुद्ध विहार समितीचे कार्यकर्ता योगेश भाऊ धनविजय ,वैभव मणिके,स्वप्नील बोदाडे, बनसोड सर,प्रमोद गोडघाटे ,युवा परिवर्तन बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक प्रीतम भाऊ खडतकर ,नालंदा अभ्यासिकेचे विद्यार्थी अपूर्वा चव्हाण,कोमल झलके, नेहा गायकवाड, अर्पित,विनय,सनी,प्रफुल यांनी केले तसेच याप्रसंगी
मूलनिवासी संघाचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल मडामे, जिल्हा सदस्य आकाश कांबळे, दक्षिण नागपूर प्रभारी सूरज पुराणिक, निलेश वागदे उपस्थित होते .
त्याच बरोबर बारा खोली, इंदोरा उत्तर नागपूर येथे सुद्धा मूलनिवासी संघा तर्फे संविधान दिवस साजरा करण्यात आला संविधानाचे प्रास्ताविक वाचून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नागपूर जिल्हा अध्यक्ष चेतन मासुरकर,राज्य सदस्य अनिल चिमनकर यांनी संविधान आणि नागरिकांचे कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन उत्तर नागपूर मूलनिवासी संघ युनिट तर्फे करण्यात आले, याप्रसंगी उत्तर नागपूर उपाध्यक्ष रोहन उके ,महासचिव अनमोल उमरे,सदस्य वीरेंद्र मोटघरे व अन्य कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here